नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातील विलास शिंदे नाराज?

Published On: June 10, 2025 1:44 pm
Vilas Shinde
Published On: June 10, 2025
Follow Us

नाशिक – शिवसेना (ठाकरे गट) मधून सुधाकर बडगुजर यांना बाहेर काढल्यावर, पक्षाचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत विलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे, ते ठाकरे गट सोडून जातील का, अशी चर्चा रंगली होती. पण आता विलास शिंदे खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे यावर अधिक लक्ष केंद्रीत झाले आहे.

सुधाकर बडगुजर यांनी सांगितले की, विलास शिंदेसह १०-१२ कार्यकर्ते पक्षात नाराज आहेत. त्यानंतर बडगुजर यांना पक्षातून काढण्यात आले. या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिंदे यांच्या कुटुंबीय कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली.

एक आठवड्यातच एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट घेतल्यामुळे, विलास शिंदे ठाकरे गट सोडतील का, अशी चर्चा झाली. या चर्चांवर शिंदे म्हणाले की, “योग्य वेळ आल्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करेन.”

नक्की वाचा :  शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
Amazon Deals - Click Here for Best Offers

आता विलास शिंदे यांनी बडगुजर यांच्यावरच टीका केली आहे. शिंदे म्हणाले की, बडगुजर यांना सर्व पदं दिली गेली, पण इतर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आम्ही अनेक वेळा नाराज झालो, पण कधी तक्रार केली नाही.

ते पुढे म्हणाले, “बडगुजर खासदार राऊत यांचे जवळचे असूनही ते नाराज का आहेत?” हे समजून घेणं गरजेचं आहे. आता आज होणाऱ्या विलास शिंदे आणि संजय राऊत यांच्या भेटीत काय चर्चा होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

Discover nashik

Discover Nashik

डिस्कव्हर नाशिक येथे आपणास नाशिकच्या समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा, निसर्गरम्य स्थळे, धार्मिक ठिकाणे, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक घडामोडींची सखोल माहिती मिळेल. आम्ही नाशिकमधील पर्यटन, व्यवसाय, शिक्षण, कला आणि मनोरंजनाशी संबंधित सर्व उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो.

Follow on Facebook

Follow Now

Follow on Whatsapp

Follow Now

Follow on Instagram

Follow Now

Follow on Threads

Follow Now

👉 Follow us on WhatsApp